VASTU-SHASTRA वास्तुशास्त्र
Introduction (प्रस्तावना)
वास्तु एक प्राचीन विज्ञान आहे, जे आपल्याला सांगते की घर, ऑफिस, व्यवसाय
इ. मध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात आणि कोणत्या गोष्टी नसाव्यात. सोबतच आपल्याला
हे देखील सांगते की कोणत्या गोष्टी साठी कोणती दिशा योग्य असेल. वास्तु दोषाचे निवारण
कसे केले जाते हे यातून समजते. हे विज्ञान कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा सांगत नाही.
कोणती खोली कोणत्या दिशेला अधिक चांगली असू शकते, कोणत्या वनस्पती घरामध्ये
वास्तु (Architecture) वस्तुतः (शब्दशः) पृथ्वी, जल, आकाश, वायु, आणि अग्नी या
पाच घटकांचे मिश्रण आहे. या घटकांच्या योग्य मिश्रणाने जैव-विद्युत (Bio-electric) चुंबकीय
ऊर्जा (Magnetic energy) निर्माण होते. ज्यामुळे मनुष्यास उत्तम आरोग्य, संपत्ती आणि
समृद्धी प्रदान होते.
जर प्राकृतिक व्यवस्थेच्या अनुसार घर बनविले गेले असेल तर प्राकृतिक प्रदूषणाची समस्या
खुप प्रमाणात कमी होऊ शकते.
Eg. (उदाहरणार्थ)
-जेणेकरून माणूस प्राकृतिक उर्जास्त्रोतांचा आपल्या घराच्या माध्यमातून स्वउपयोगासाठी वापर
करू शकेल. कारण सूर्याच्या सकाळच्या किरणांमध्ये vitamin -D चा बहुमुल्य स्त्रोत असतो,
ज्याचा प्रभाव आपल्या रक्ताच्या माध्यमातून आपल्या शरीरावर पडत असतो.
अशाचप्रकारे दुपारनंतर सूर्याची किरणे (Radiations) ने ग्रस्त झाल्यामुळे शरीरावर विपरीत
परिणाम होऊ शकतात. म्हणून घर निर्माण करताना घराचे अभिमुख (orientation) अशा
प्रकारे ठेवले गेले पाहिजे जेणेकरून दुपारच्या किंवा दुपारनंतरच्या सूर्याच्या किरणांचा प्रभाव
आपल्या शरीरावर आणि घरावर कमीत कमी पडावा.
दक्षिण-पश्चिम दिशेच्या पृष्ठभागावर घर निर्माण करताना उत्तर-पूर्वेचा पृष्ठभाग खाली ठेवला
जातो कारण सकाळी सूर्याच्या किरणांमध्ये Vitamin D, F आणि A असतात.
जर पूर्वेकडील क्षेत्र पश्चिम क्षेत्रापेक्षा खाली असेल (खालच्या बाजूला) तर अधिक दरवाजे,
आणि खिड़क्या असल्यामुळे सकाळच्या सूर्याच्या किरणांचा लाभ संपूर्ण घराला प्राप्त होतो.
उत्तर आणि पूर्व क्षेत्र अधिक मोकळे असेल तर घरामध्ये सतत वायु (वारा) प्रवेश करत राहतो.
आणि चुंबकीय किरणे जे उत्तरेकडुन दक्षिणेकड़े जात असतात त्यात अडथळा येत नाही.
यामुळे वायुमंडळ पदूषण दूर होते.
The information is Useful and in logical direction.
ReplyDelete